🕒 1 min read
मुंबई: रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली CSKला लखनऊ विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चेन्नईचा या मोसमातील हा सलग दुसरा पराभव आहे. कर्णधार म्हणून जड्डूची सुरुवात खूपच खराब झाली. शेवटच्या डेथ ओव्हरमधील त्याच्या एका चुकीने सामन्याचे चित्र पालटले आणि सुपर जायंट्सने २१० धावांचे मोठे लक्ष्य गाठून सामना जिंकण्यात यश मिळवले. फलंदाजीत सर्वोत्तम खेळी करणारा शिवम दुबे या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरला आहे.
चेन्नईने सामन्यात उत्तम फलंदाजी करत २१० धावांचा मोठा डोंगर उभारला. पण, गोलंदाजीत त्यांची कामगिरीने आणि निर्णय खूप निराशाजनक ठरले. डेथ ओव्हरमध्ये झालेल्या चुकीची किंमत रवींद्र जडेजाला (ravindra jadeja) भरावी लागली. स्वत: ऐवजी त्याने शिवम दुबेला (shivam dube) १९ वे षटक टाकण्यास दिले . या षटकात दुबेला एविन लुईसने लक्ष्य केले. त्याने आपल्या संघासाठी झटपट धावा केल्या आणि सामना कसा जिंकला जातो हे सांगितले. यानंतर आयुष बदोनीनेही (aayush badoni) आपल्या बॅटची ताकद दाखवत शेवटच्या षटकात २ गगनचुंबी षटकार ठोकत सामन्यात संघाला स्फोटक विजय मिळवून दिला.
आयपीएल इतिहासात पहिल्यांदा चेन्नई सुरुवातीचे दोन सामने लगातार हारली आहे. ज्यानंतर रवींद्र जडेजाने पराभवाचे कारण सांगितले की , “आम्ही चांगली सुरुवात केली होती. पण, आम्ही अनेक झेल गमावले ज्याची किंमत आम्हाला महागात पडली. मैदानावर भरपूर ड्यू होता, त्यामुळे फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागत होता. विकेटवर फलंदाजी करणे सोपे होते. आमच्या फलंदाजांनीही चांगली फलंदाजी केली. गोलंदाजी करताना आम्ही आमच्या योजनेवर ठाम राहू शकलो नाही. त्यामुळे सामना हाताबाहेर गेला.”
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: CSK विरुद्ध शानदार विजयानंतर कर्णधार राहुलने केले ‘या’ खेळाडूचे कौतुक; म्हणाला ‘तो फायटर…’
- “जुन्या पोस्ट काढून खेळणाऱ्या विकृत सोशल भावांनो…”, रुपाली पाटलांचा हल्लाबोल
- “जनतेच्या पाकीटमारांचा तपास पूर्ण झाला की…”, ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला
- Pariksha Pe Charcha : “आगामी परीक्षेचा वेळ तुमच्या रुटीनप्रमाणेच…”, मोदींनी दिल्या विद्यार्थ्यांना ‘या’ टिप्स
- IPL 2022: रिश्तों के भी रूप बदलते है! सामना संपल्यानंतर दिसला धोनी- गंभीरचा ‘याराना’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
