Share

मला अर्थमंत्री होऊ द्या, 20 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो- सुधीर मुनगंटीवार

Published On: 

पुणे : पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन केंद्र सरकारविरोधात टीकेची झोट उठवत होते. केंद्र सरकारकडून इंधन दरवाढीवर राज्यातील राजकीय नेत्यांसह सामान्य नागरिकही आक्रमक झाल्याचे पाहायाला मिळाले. त्यातच आता माजी केंद्रीय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी अर्थमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राज्यातल्या जनतेला स्वस्तात पेट्रोल देण्याची इच्छाशक्ती राज्य सरकारने दाखवली तर राज्यात पेट्रोल 20 रूपयांनी कमी होऊ शकते, असे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटिवार यांनी व्यक्त केले.

मला अर्थमंत्री होऊ द्या, 20 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी कमी करून दाखवतो, असा दावा मुनगंटिवार यांनी केला. महाविकास आघाडी सरकारला निर्णय घेता येत नसल्याने पेट्रोलचे दर चढे आहेत, अशी टीका यावेळी मुनगंटीवारांनी केली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून केंद्र सरकारला जबाबदार धरणाऱ्या राज्य सरकारने पेट्रोलवर जवळपास 32 रूपये कर लावला आहे. हा कर कमी केला तर राज्यात पेट्रोल वीस रूपयांनी कमी होऊ शकते. वस्तू व सेवा करात (जीएसटी) पेट्रोल-डिझेलचा समावेश केला तर दरात आणखी कपात होऊ शकते. मात्र, केंद्राला जबाबदार धरणारे राज्य सरकार पेट्रोल-डिझेलचा जीएसटीत समावेश करण्यास विरोध करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!