Share

मुंबईच्या माजी वेगवान गोलंदाजाचं निधन; ४०व्या वर्षी आला Heart Attack!

Published On: 

मुंबई : मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज आणि २००६-०७ रणजी (Ranji Trophy) करंडक विजेत्या संघाचा सदस्य राजेश वर्मा (Rajesh Verma) याचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजेश ४० वर्षांचे होता. मुंबईचा माजी खेळाडू भाविन ठक्करने त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला. आपल्या कारकिर्दीत केवळ सात प्रथम श्रेणी सामने खेळू शकलेला राजेश मुंबईच्या रणजी चॅम्पियन संघाचा महत्त्वाचा सदस्य होता.

२००२-०३ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि २००८ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर पंजाबविरुद्ध शेवटचा सामना खेळला. त्याने ७ सामन्यात २३ विकेट घेतल्या. ९७ धावांत पाच बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. याशिवाय त्याने ११ ‘लिस्ट ए’ सामन्यांत २० विकेट घेतल्या.

https://twitter.com/TheSummerNews2/status/1518201840235520000

मुंबईचे माजी खेळाडू आणि भारताचे दिग्गज क्रिकेटपटू विनू मांकड यांचा मुलगा राहुल मांकड यांचेही निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. विनू मांकड यांचे पुत्र राहुल मांकड यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. राहुल हे अष्टपैलू खेळाडू होते आणि त्यांनी ४७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २१११ धावा केल्या होत्या. यात त्यांची सर्वोत्तम धावसंख्या १६२ होती. त्यांच्या नावावर ५ शतके आणि १२ अर्धशतके आहेत. त्यांचे भाऊ (अशोक आणि अतुल) देखील क्रिकेटपटू होते. अशोक भारताकडूनही खेळले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!