Share

लातूर एमपीएससीच्या परीक्षेला अडीच हजार परीक्षार्थींची पाठ

Published On: 

लातूर : राज्यात कोरोना कहर वाढत असल्यामुळे तीन वेळा रद्द करण्यात आलेल्या एमपीएससीच्या परीक्षा अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे २१ मार्चला घेण्यात आल्या. पण या परीक्षेला मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर संताप व्यक्त करीत परीक्षार्थींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ नवीन तारीख जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी शहरातील १९ केंद्र होती. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ५ वाजण्याच्या दरम्यान दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी प्रशासन आणि केंद्राकडून घेण्यात आली होती. परीक्षार्थीस मास्क, सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आले होते. या परीक्षेसाठी एकूण ७ हजार ८९० परीक्षार्थी होते. त्यापैकी ५ हजार २९८ परीक्षार्थींनी उपस्थित राहून परीक्षा दिली. २ हजार ५९२ परीक्षार्थी गैरहजर राहिल्याचे सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!