नवी दिल्ली : मराठा समाजाला अद्यापही आरक्षणाची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झाला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता मराठा समाज हा पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महापूर आणि राज्यातील कोरोनाची स्थिती ओसरल्यानंतर आता मराठा समाजाने पुन्हा आंदोलन सुरु केलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. आता तेमराठा समाजाच्या आरक्षणासाठी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार असून राष्ट्रपती कार्यालयाने देखील त्यांची भेट मंजूर केली आहे. याबाबत संभाजीराजे यांनी एक ट्विट करू माहिती दिली असून सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीसाठी जाणार असल्याचं सांगितलं आहे.
‘राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी दि. २ सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी १ खासदार प्रतिनिधीने उपस्थित रहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निर्बंध शिथिल झाल्यानंतर मास्कचा वापरही झाला कमी, मास्क विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट
- ‘शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील ,तुम्ही मर्यादा ओलांडली तर..’, राऊतांचा इशारा
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : आता ‘या’ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील लागू होणार अनुकंपा धोरण
- जन आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार – प्रमोद जठार
- ‘मुका मोर्चा म्हणाला तेव्हा संजय राऊत तुम्ही गांजाची की अफूची गोळी घेतली होती?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
