🕒 1 min read
नवी दिल्ली – देशानं कोरोना लसीकरणात शंभर कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल जगभरातल्या अनेक नेत्यांनी भारताचं अभिनंदन केलं आहे. या अभिनंदनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत. लशीची उपलब्धता हे कोरोना संसर्गाविरोधात लढण्याचं महत्वाचं शस्त्र आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.
कोरोना संसर्गाविरोधात इतर देशांच्या सहकार्यानं लढण्यास भारत कटिबद्ध आहे,असं मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांचे आभार मानताना सांगितलं. श्रीलंका आणि मालदीव या देशांच्या प्रमुखांनीही केलेल्या अभिनंदनाबद्दल आभार व्यक्त करताना मोदी यांनी, लसीकरणासाठी एकमेकांना केलेल्या मदतीच्या माध्यमातून संबंध अधिक दृढ झाले असल्याचं सांगितलं. मोदी यांनी इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि इतर नेत्यांकडून आलेल्या अभिनंदनाला प्रतिसाद दिला.
दरम्यान, कोविड लसीकरणाच्या 100 कोटी मात्रा ,हा केवळ आकडा नाही तर देशाच्या सामर्थ्याचं प्रतिबिंब आहे, ज्या देशांना भारताविषयी प्रश्न पडले होते, त्यांच्या प्रश्नाना दिलेलं उत्तर आहे . हे यश प्रत्येक भारतीय नागरीकाचं आहे असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं. आज सकाळी त्यांनी देशातल्या नागरिकांसोबत संवाद साधला.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाची अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक
- राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला-धनंजय मुंडे
- ‘तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें’, भाजपचा पलटवार
- लालबागेतील आगीला व्यवस्थापन जबाबदार, महापौर किशोरी पेडणेकर
- ‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले

