Share

‘भगवान राम, भगवान कृष्ण यांच्या सन्मानासाठी संसदेत कायदा करावा’, अलाहाबाद न्यायालयाची मागणी

Published On: 

🕒 1 min read

अलाहाबाद : ‘भगवान राम, भगवान कृष्ण यांच्या सन्मानासाठी संसदेत कायदा करावा’ अशी मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली आहे. एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान ‘भगवान राम, भगवान कृष्ण हे देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. त्यांना राष्ट्रीय सन्मान देण्यासाठी संसदेमध्ये कायदा करावा’, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले आहे.

‘बार अँड बेंचने’ दिलेल्या वृत्तानुसार भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्याविषयी आक्षपार्ह भाषेत फेसबुकवर लिहिणाऱ्या व्यक्तीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. सदर व्यक्ती गेल्या १० महिन्यांपासून या गुन्ह्यासाठी तुरुंगात असून आज त्याला सुनावणीअखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यावेळी बोलताना अलाहाबाद न्यायालयातील न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने राम, कृष्ण हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य भाग असल्याचे म्हंटले आहे.

यावेळी बोलताना न्यायमूर्ती शेखर यादव म्हणाले की,’आरोपीने भगवान राम आणि भगवान कृष्ण या महान व्यक्तींच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे देशातील बहुसंख्य नागरिकांच्या श्रद्धांना धक्का बसला आहे. यामुळे देशातील शांतता आणि सौहार्द धोक्यात येतं आणि त्याचे परिणाम निष्पाप नागरिकांना भोगावे लागतात.’ तसेच ‘जर अशा प्रकरणांमध्ये न्यायालयांनी कठोर भूमिका घेतली नाही, तर त्यामुळे अशा लोकांचं धैर्य वाढेल आणि त्याचा देशाच्या सौहार्दाला फटका बसेल’ असे ते म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलतांना ‘भगवान राम, भगवान कृष्ण, रामायण, गीता आणि त्यांचे लेखक महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यास हे देशाच्या सांस्कृतिक वारशाचे अविभाज्य भाग आहेत. देशाच्या संसदेमध्ये यासंदर्भातला कायदा पारित करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मान दिला गेला पाहिजे’, असेही न्यायमूर्ती शेखर यादव यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!