मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त उद्या (बुधवार) राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली.
दरम्यान, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचं पालनही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास तीन तास अयोध्या दौऱ्यावर असतील. यामध्ये मंदिराचं दर्शन, पूजा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.
दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी अयोध्येला श्री राम जन्मभूमि वर होणाऱ्या भूमिपूजन समारोहासाठी देश भराच्या पवित्र मठ / मंदिरांची माती आणि पवित्र नद्यांचे जल अयोध्येला पाठविण्यात आले. विश्व हिंदू परिषद कोंकण प्रांत द्वारा वि.हिं.प. चे जन्मस्थान असलेले सांदिपनी आश्रम – पवई, श्री भगवान खंडेराय यांच्या बाणा ने उत्पन बाण गंगा देवस्थान मुम्बई, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महारज यांच्या स्वराजाची राजधानी दुर्गराज किल्ले रायगड तसेच गोवा राज्य प्रसिद्ध और पवित्र मंदिर शांता दुर्गा (कवळे), मंगेशी (फोंडा), मल्लिकार्जुन (काणकोण), म्हाळसा देवस्थान (मार्दोळ), महालक्ष्मी देवस्थान (पणजी), लईराई देवस्थान शिरगाव और महारुद्र मंदिर हरवले (साखळी) इत्यादी मंदिर / मठांच्या विश्वस्थ आणि पुजार्यांनी आप आपल्या मंदिर परिसरातील माती व पवित्र नद्यांचे पाणी अयोध्येत होत असलेल्या श्री राम जन्मभूमि वर होणार्याभूमिपूजन समारोहासाठी विश्व हिंदू परिषदे कडे सुपूर्द करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा – चंद्रकांत पाटील
राज्यातील महिलांच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडी सरकार कधी जागे होणार ?
शंभर किलो पुस्तकांच्या ग्रंथतुलेतून ‘रिपाइं’तर्फे अण्णाभाऊंना अभिवादन
युपीएससी २०१९ चा निकाल जाहीर! अभिषेक सराफ महाराष्ट्रात पहिला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

