Share

काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या देखील कोरोना बाधित

Published On: 

🕒 1 min read

कर्नाटक: देशभरात कोरोनाने थैमान घातले असून सर्वसामान्य ते अनेक सेलिब्रेटी,राजकीय नेते हे देखील या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. ते ७१ वर्षीय असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कालच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. “माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी लक्षणे तपासण्याची आणि स्वत:ला क्वॉरन्टाईन ठेवण्याची विनंती करतो” असे ट्वीट सिद्धरामय्या यांनी केले आहे. सिद्धरामय्या यांना बंगळुरुच्या मणीपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारला मुंबई पोलिसांवर गर्व असेल तर सांगावं त्यांनी ५० दिवसांत काय केलं? बिहार पोलीस महासंचालक

त्यांची प्रकृती स्थिर असून देखरेख ठेवली जात आहे. सिद्धरामय्या यांना कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत, अशी माहिती मणीपाल रुग्णालयाने निवेदनात दिली. तर, सिद्धरामय्या यांनी २०१३ ते २०१८ या काळात कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळला असून सद्या ते विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळत आहेत.

अयोध्या निकाल तथ्यावर आधारित नसून भावनांवर देण्यात आला; प्रकाश आंबेडकरांचा दावा

दरम्यान, कालच बी. एस. येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘मला कोरोनाची लागण झाली असून तब्येत स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात जे कोणी आले असतील, त्यांनी स्वत:ला क्वॉरन्टाईन करावं,’ असं आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केलले होते. याआधी, दरम्यान,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

मान्सून अलर्ट: मुंबई महापालिकेने केले ‘हे’ आवाहन

तसेच, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची COVID-19 चाचणी देखील काल पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता उपचार सुरु करण्यात आले आहेत. तर, कोरोनामुळे रविवारी (2 ऑगस्ट) उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण यांचं निधन झालं आहे. लखनौमधील एसपीजीआयमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमला राणी या उत्तर प्रदेशच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होत्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!