Share

पण आता माझ्यावर रडण्याची वेळ आली आहे, इंदुरीकरांना भावना अनावर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सम- विषम च्या फोर्म्युल्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एक वाद कमी होत असताना आता त्यांचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्यांनी चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल असे विधान केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे चर्मकार समाजाचा तसेच संविधानाचा अवमान झाला असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे. त्यावर इंदुरीकर यांना भावना अनावर झाल्या आहे. मी गेली सव्वीस वर्षे लोकांना हसवत आहे पण आता माझ्यावर रडण्याची वेळ आणली आहे.अशी खंत सुप्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी नगर तालुक्यातील आठवड येथे बोलताना व्यक्त केली. "समाजातील हसणे कमी होत आहे. खळखळून हसल्यावर ताण कमी होतो.मी हसवतोय पण आता मलाच रडवायला लागले आहेत.असे सांगितले. असेही ते यावेळी म्हणाले.

दोन दिवसापूर्वी त्यांचा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात कार्यक्रम होता मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केल्यामुळे कार्यक्रम रद्द केला. त्यांनतर त्याच दिवशी त्यांनी सांगली जिल्हातील कर्नाळ येथे किर्तन केले. दरम्यान, इंदुरीकर यांना काही संघटनांकडून विरोध झाल्यावर तरुण मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी उभा राहिले. इंदुरीकर यांच्या काही गावात मिरवणुका काढल्या. त्यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत गेला. सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी इंदुरीकर यांना पाठिंबा दिला

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!