Share

Chandrashekhar Bawankule | “ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच”; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान 

Published On: 

Chandrashekhar Bawankule | मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात भेटीची आज चर्चा होत आहे. सत्तेतून पायऊतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट राजकीय समीकरण बळकट करण्यात व्यस्त आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीशी उद्धव ठाकरे युती करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच आहेत. आज केवळ दाखवण्यासाठी एकत्र बसतील. हे सर्व आतून एकच आहेत”, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलाय. “कोणतीही मतं कोणाची जहागिरी नाही. जेव्हा लोकांना वाटतं की हा पक्ष आमच्या हिताचा आहे तेव्हा ते त्या पक्षाला मतं देतात. कोणी म्हणत असेल की मागासवर्गीय मतं माझ्याकडे गठ्ठा आहे आणि मी इकडे देणार, तिकडे देणार, तर मतदार आता कधीही कोणाच्या म्हणण्यावर इकडे तिकडे जात नाही”, असंही ते म्हणालेत.

“जो स्थानिक पातळीवर जनतेला मदत करतो, जनतेचे कामं करतो त्यांच्यामागे लोकं उभे राहतात. सध्या लोक शिंदे-फडणवीस सरकारच्या मागे आहेत, मोदींच्या मागे लोक आहेत. त्यामुळे यांच्या युतीने महाराष्ट्रात काहीही फरक पडत नाही,” असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावला.

दरम्यान, युतीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “पक्षाची भूमिका आम्ही जाहीर केली आहे. शिवसेनेला आम्ही कळवले आहे की युती करायला आम्ही तयार आहोत. माध्यमांना सांगायचे आहे की काही गोष्टी जाहीर करायच्या असतील तर आम्ही जाहीर करु. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!