Share

… म्हणून राज्यातील महापौर-उपमहापौरांच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलल्या

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या कालावधीत राज्यातल्या ज्या महानगरपालिकांमधल्या महापौर आणि उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे, त्यांच्या निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. राज्यात ऑक्टोबर-2019 मध्ये प्रस्तावित असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणूकीत अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या परभणी जिल्हा कार्यालयातून तीन कोटी पासष्ट लाख सत्तावन्न हजार रुपयांचा अपहार केल्याबद्दल, महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे, व्यवस्थापक सुग्रीव गायकवाड, यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.

यंत्रमाग महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणं, उद्योगांना कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेला स्ट्राईव्ह हा प्रकल्प राज्यात राबवणं, निवडणूक लढवण्यास इच्छूक व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देणं, विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या कौशल्य आणि उद्योजकता विकास तसंच क्षमता वृद्धिंगत योजनांचं एकसुत्रीकरण करणं, आदी निर्णयांनाही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!