टीम महाराष्ट्र देशा : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येवेळी वापरण्यात येणाऱ्या शस्त्राच्या तपास यंत्रणेत परदेशी तपास संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वकिलांनीच काल मुंबई उच्च न्यायालयाला ही माहिती दिली. दाभोलकर खून प्रकरणातल्या आरोपींनी ज्या पिस्तुलानं हत्त्या केली ते ठाणे खाडीत फेकून दिल्याचं कबूल केलं आहे. त्या अनुशंघाने पुढील तपास परदेशी संस्थेच्या मदतीने करण्यात येणार आहे.
तसेच परदेशी तपास यंत्रणेचे तज्ज्ञ रविवारी भारतात पोहचणार आहेत. तिथून पुढे तपासाला सुरवात होणार आहे. शस्त्र शोधायला वेळ लागण्याची देखील शक्यता आहे. याची कल्पना सीबीआयने उच्च न्यायालयाला दिली आहे. डॉ. दाभोळकरांच्या हत्येतील मारेकरी पकडले गेले आहेत. या हत्ये मागे अनेकजण सामील आहेत.
तसेच सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर व त्यांचे सहकारी विक्रम भावे यांनी हत्येचे पुरावे नष्ट करण्यात मदत केली असल्याच्या आरोपावरून पोलीस अटकेत आहेत. त्यामुळे दिलेल्या माहितीनुसार पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
कर्डिलेंचं तिकीट कापण्याचा प्रश्नच येत नाही, भाजपच्या बड्या नेत्याचे वक्तव्य
मोठा राजकीय खल झाला पण अखेर ‘त्या’ निर्णयावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झालीच – कुल
सरकारला उशिरा सुचले शहाणपण; आता पूरग्रस्तांना रोख रक्कमेत दिली जाणार मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

