🕒 1 min read
मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
दरम्यान मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.
यावरून विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर टीका केली आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस उपनिरीक्षक वाझेला दरमहा १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचे अत्यंत गंभीर आरोप पत्राद्वारे केले आहेत. पत्रातील थेट पुरावे लक्षात घेता हे आरोप संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारे आहेत. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब, लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब, स्व.आर.आर.पाटील आबा, विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वकर्तृत्वावर निष्कलंकपणे काम करुन गृहखात्याची मान उंचावली.
९० च्या दशकात पोलीसांचे मनोबल वाढवून कुख्यात गँगस्टरांचे रेकॉर्डब्रेक एन्काउंटर करुन मुंबईतील टोळीयुद्धांचा खात्मा करणारे स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेऊन तो न्यायालयात यशस्वीपणे टिकवणारे स्व. आर.आर.आबा, पाच वर्ष सक्षमतेने मुख्यमंत्रीपदासोबत गृहखाते निष्कलंक कारभार पाहणारे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गृहमंत्री कसा असावा याचा आदर्श घालून दिला. परंतु स्व.आर.आर. आबांच्याच पक्षाच्या गृहमंत्र्याने महाराष्ट्राच्या गृहखात्याला कलंकित केले. सदरील प्रकरण अत्यंत गंभीर असून या बाबत मुख्यमंत्र्यांनी व पक्षाच्या प्रमुखांनी तात्काळ निर्णय घ्यावा..! असा सल्ला विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी सरकारला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अन् रस्ता ओलांडताना सापडले गलगले; भरत जाधवने केला अनुभव शेअर
- इंग्रजांना पुन्हा धूळ चारली, रोहित-भुवनेश्वरच्या धमाक्यापुढे साहेबांनी गुडघे टेकले !
- परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
- आयपीएलआधी खेळाडूंना कोरोना लस द्या ; ‘या’ संघाची बीसीसीआयकडे मागणी
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

