🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२१ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. ९ एप्रिलला पहिला सामना तर अंतिम सामना हा ३० मे रोजी होणार आहे. मात्र, यंदाही स्पर्धा विनाप्रेक्षकच पार पडणार आहे. परंतु अखेरच्या टप्प्यात करोनाचा संसर्ग कमी झाल्यास निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
कोरोना व्हायरसमुळे यावर्षीची आयपीएल फक्त 6 ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटात प्रवासावर निर्बंध आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्यामध्ये आता दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने बीसीसीआय आणि सरकारकडे विशेष मागणी केली आहे. खेळाडूंना कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी दिल्ली कॅपिटल्सने बीसीसीआय आणि सरकारला केली आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे, तर 30 मे रोजी आयपीएलची फायनल होणार आहे. बायो-बबलमध्ये संपूर्ण आयपीएल खेळवली जाणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे सीईओ विनोद बिष्ट म्हणाले, ‘लस आमच्या डोक्यात आहे. खेळाडूंना एका शहरातून दुसऱ्या शहरात जावं लागेल, त्यामुळे आम्ही बीसीसीआयकडे ही मागणी केली आहे. बोर्ड याबाबत सरकारला विनंती करू शकते, पण याबाबत मला काहीही माहिती नाही. सरकार याला प्राथमिकता देईल, अशी आमची अपेक्षा आहे. ऑलिम्पिक खेळाडूंना आधीच यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे, त्यामुळे सरकार आम्हालाही मदत करेल.’
महत्वाच्या बातम्या
- अन् रस्ता ओलांडताना सापडले गलगले; भरत जाधवने केला अनुभव शेअर
- इंग्रजांना पुन्हा धूळ चारली, रोहित-भुवनेश्वरच्या धमाक्यापुढे साहेबांनी गुडघे टेकले !
- परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
- हे तर अधिकाऱ्यांना दबावात आणून भाजपने केलेलं षडयंत्र : सचिन सावंत
- १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचासुद्धा सहभाग : नारायण राणे


