Share

‘गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

दरम्यान मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

यावरून भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी देखील गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ‘राज्यात नेमके काय चालले आहे, हे महाविकासआघाडी सरकार आहे की ‘महावसुली सरकार’ आहे… राज्यातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले, महिलांच्या हत्येचे आरोप करण्यात आले, काही प्रकरणात गुन्हे दाखल झाले परंतु कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. अशी अनेक प्रकरणे दडपली गेली आणि आता वाझे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस अधिकारी परमविर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत.

व्हाट्सअप चॅटचे पुरावे सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. गृहमंत्री पोलिसांना हप्ते गोळा करायला सांगतात, खंडणी वसूल करायला सांगतात आणि हे जेव्हा पुराव्यानिशी समोर येते तेव्हा तातडीने नैतिकता म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे, परंतु गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे साथीदार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे तरच हे सरकार पारदर्शक आहे असे म्हणता येईल’

या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सिगं यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. सिंग यांनी आरोप सिद्ध करावेत, असे थेट आव्हान देत देशमुख यांंनी सिंग यांच्यावर अब्रुनुकसाणीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिलीय. देशमुखांनी काढलेलेल्या प्रसिद्धी पत्रकात हे स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!