🕒 1 min read
अहमदाबाद : पाच टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना अखेर भारतीय संघाने पाचव्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात बाजी मारली आहे. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर संघाला हे यश संपादन करण्यात आलं.
इंग्लंड संघापुढं रोहित शर्माच्या वादळी ३४ चेंडू मधील ६४ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये २२५ धावांचं आव्हान ठेवले होते. हा धावांचा डोंगर उभा करण्यासाठी कर्णधार विराट कोहली याने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची आक्रमक खेळी केली. तर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अनुक्रमे १७-१७ चेंडूंत ३२ आणि ३९ धावा चोपल्या.
भारतीय संघांच्या शिलेदारांनी रचलेल्या बलाढ्य धावसंख्येचा पाठलाग करताना पाहुण्या इंग्लंड संघाची सुरवात खराब झाली भारतीय गोलंदाजीचा हुकमी एक्का भुवनेश्वर कुमार याने जेसन रॉयला पहिल्याच षटकात शून्यावर तंबूत पाठवले. त्यानंतर डेव्हिड मलान आणि जॉश बटलर यांनी अधिक पडझड होऊ न देता १३० धावांची आक्रमक भागीदारी केली. मग पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमार याने गोलंदाजीची कमान हाती घेत जॉश बटलरला ५२ धावांत तंबूत पाठवल.
C.H.A.M.P.I.O.N.S! ????????#TeamIndia @GCAMotera #INDvENG @Paytm pic.twitter.com/V0zCW4BugT
— BCCI (@BCCI) March 20, 2021
यानंतर इंग्लडचा डाव सावरलाच नाही त्यांनी निर्धारित २० षटकांत ८ बाद १८८ धावा केल्या आणि भारताने हा निर्णायक सामना ३६ धावांनी जिंकत मालिका ३-२ अशी खिशात घातली. भारताकडून शार्दुल ठाकूरने ३ बळी घेतली तर हार्दिक पंड्या आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. ४ षटकांत १५ धावा देत २ बळी घेणाऱ्या भुवनेश्वर कुमार याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं. तर संपूर्ण मालिकेत धावांचा पाउस पडणाऱ्या विराट कोहलीला मालिकावीर म्हणून घोषित केले.
महत्वाच्या बातम्या
- परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
- हे तर अधिकाऱ्यांना दबावात आणून भाजपने केलेलं षडयंत्र : सचिन सावंत
- १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचासुद्धा सहभाग : नारायण राणे
- पंधरा केंद्रांवर तीन हजार 912 परीक्षार्थी एमपीएससीची परीक्षा देणार
- १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचासुद्धा सहभाग : नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

