🕒 1 min read
मुंबई : निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे निधन झालं आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 91 व्या वर्षी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी बाणेरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.
पी.बी.सावंत यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे न्यायदानाच्या क्षेत्रातील व पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीतील कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने या दोन्ही क्षेत्रासाठींचे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली’ अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे न्यायदानाच्या क्षेत्रातील व पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीतील कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने या दोन्ही क्षेत्रासाठींचे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली????????— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 15, 2021
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे नंतर त्यांनी जबाबदारी सोडली होती. पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला होता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एल.एल.बी) मिळविल्यानंतर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे वकील म्हणून सराव सुरू केला.
1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सहा वर्ष त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. 1995 मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून ते सार्वजनिक कार्यात सक्रिय होते.
महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये काका-पुतण्यांच्या राजकारणामुळे जनता वेठीस-विनायक मेटे
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- हिरकणीनंतर आता सोनाली कुलकर्णी झळकणार आणखी एका शौर्यगाथेत
- ‘सतत टीका करणे योग्य नाही’, चेन्नईच्या पिचला नावं ठेवणाऱ्यांना गावसकरांचं चोख उत्तर
- कोणी काहीही बोलू द्या, मी संयमाने जनतेची कामे करतो-आ.संदिप क्षीरसागर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

