🕒 1 min read
मुंबई: चारा घोटाळ्यातील राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासासह ६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Atul Bhatkhalkar Reaction) लालू प्रसाद यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar Reaction) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. “एके काळी दबंग होते, मुख्यमंत्री होते… सध्या तुरुंगात आहेत” , असे भातखळकर यांनी म्हटले आहे. दरम्यान सीबीआय न्यायालयाने लालू प्रयाद यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली असून सोबतच ६० लाखांचा दंडही ठोठावला आहे. दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी सीबीआय न्यायाधीश एसके शशी यांच्या विशेष न्यायालयाने २१ फेब्रुवारी रोजी लालूंसह ३८ दोषींना दोषी ठरवत शिक्षेवर सुनावणीची तारीख निश्चित केली होती. सध्या लालू यादव रांची रिम्समध्ये उपचार घेत आहेत.
एके काळी दबंग होते, मुख्यमंत्री होते… सध्या तुरुंगात आहेत pic.twitter.com/zqlGTLSymJ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 21, 2022
दरम्यान सुमारे २३ वर्षे जुने हे प्रकरण १९९० ते १९९५ दरम्यान झारखंडच्या डोरंडा येथे असलेल्या ट्रेझरीमधून १३९.३५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याबाबत आहे. या प्रकरणात तब्बल ५७५ जणांचे जबाब घेण्यात आले. तर बचाव पक्षाचे वकील संजय कुमार यांनी म्हटले की, लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्याच्या ४ प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यात चाईबासा कोषागारातून बेकायदेशीर पैसे काढण्याचे दोन प्रकरण आहेत. दरम्यान लालू प्रसाद यांना देवघर आणि दुमका कोषागार प्रकरणात जामीन मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “राऊतांनी उद्धव ठाकरेंचं घर उद्ध्वस्त करायची सुपारी घेतली”, चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान
- “हार्दिकला परत संघात आणू नकोस”; माजी खेळाडूचा रोहितला सल्ला
- साहाच्या खुलास्यानंतर बीसीसीआय उचलणार मोठे पाऊल!
- Breaking News : चारा घोटाळयाप्रकरणी लालू यादव यांना पाच वर्षांची शिक्षा
- भारताच्या १६ वर्षीय ग्रँडमास्टर प्रग्नानंधाकडून वर्ल्ड नं १ कार्लसन पराभूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
