Share

भारतीयांचे उपकार फेडण्याची हीच ती वेळ, आयपीएलच्या ‘मास्टरमाईंड’ने बीसीसीआयला सुनावले !

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देश भयंकर संकटात सापडला आहे. देशात कोरोना रुग्णांची दररोज होणारी वाढ रेकॉर्ड मोडत आहे. त्यामुळे देशात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊनची चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. दरम्यान, देशातील कोरोनावरील अनियंत्रित वेग नियंत्रित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला लॉकडाऊनबाबत विचार करण्यास सांगितला आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या मागील ८-९ दिवसांपासून दररोज साडेतीन लाखांच्या घरात वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण वाढत आहे. त्यात ऑक्सिजनची कमतरतेनं लोकांना जीव गमवावा लागत आहे. अशात पॅट कमिन्स, ब्रेट ली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, सचिन तेंडुलकर अशा अनेकांनी पुढे येऊन पुन्हा मदत केली आहे. आता आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे.

२००८मध्ये ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आयपीएल उदयास आली. भारतात कोरोना परिस्थिती बिकट असताना बीसीसीआयच्या असंवेदनशीलतेवर टीका केली आहे. आयपीएल २०२० व आयपीएल २०२१तून मिळणाऱ्या उत्पन्नातील १० टक्के रक्कम बीसीसीआयनं कोरोनामुळे निधन झालेल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी दान करावेत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. १० टक्के रक्कम म्हणजे ७०० ते ८०० कोटी, हे गणितही मोदींनी समजावून सांगतिले. या रक्कमेतून देशाला खूप मोठी मदत मिळेल.

मागील दोन वर्षांत आयपीएलमधून केलेल्या कमाईतील १० टक्के रक्कम बीसीसीआयनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी द्यावी. या फॅन्समुळेच भारतात क्रिकेट एवढा मोठा झाला आहे. ही कृती करायची आणि देशाला उपकाराची परतफेड करण्याची वेळ आहे. आयपीएल यापेक्षा अधिक करू शकतं, पण मला हे कळतं नाही त्यांना कोण रोखत आहे. प्रत्येक जीवाचे, प्रत्येक भारतीयाचे आयुष्य महत्त्वाचे आहे. ही वेळ एकजुटता दाखवण्याची व एकत्र येऊन लढण्याची आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!