Share

लॉकडाऊनचे परिणाम चांगले, शहरी भागात कोरोना नियंत्रणात – छगन भुजबळ

Published On: 

नाशिक : लॉकडाऊन झाल्यापासून शहरी भागातील रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र ग्रामीण भागात अद्यापही रुग्णवाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी रुग्णसंख्या कमी कशी होईल त्यादृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राजियांचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

आज येवला विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक पार पडली, त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी येवला नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रांत अधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तहसीलदार प्रमोद हिले, तहसीलदार शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकाडे उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ऑक्सिजनची कमतरता होऊ नये यासाठी ऑक्सिजनचा आवश्यक साठा रुग्णालयात ठेवण्यात यावा. डॉक्टर तसेच इतर कर्मचारी मनुष्यबळाची कमतरता असलेल्या केंद्रावर तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे. बंद असलेले व्हेंटीलेटर तातडीने सुरू करण्यात यावेत. ड्युरा आणि जम्बो सिलेंडरची आवश्यकता असल्यास आपली मागणी कळविण्यात येऊन उपलब्ध ते करून घेण्यात यावेत. शहरात प्रत्येक वार्डात नगरसेवकांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन तपासणी मोहीमेस सहकार्य करण्याचे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

तर, गृहविलीगिकरण यशस्वीरित्या पार पाडावे. त्याचबरोबर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सर्वांनी आता आपापली जबाबदारी लक्षात अथक प्रयत्न करावेत. असे देखील छगन भुजबळ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!