बंगळुरू : ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास विलंब झाल्याने कर्नाटकातील चमराजनगर जिल्ह्यात २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. मरण पावलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचाही समावेश आहे. बल्लारी येथून रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा येणार होता. पण ऑक्सिजन येण्यास विलंब होत असल्याने आपतकालीन ऑक्सिजनसाठी जिल्हा रुग्णालयातून मध्यरात्री २५० ऑक्सिजन सिलेंडर मैसूरला पाठवण्यात आले होते. मात्र, वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात न आल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला.
Karnataka | 24 patients, including COVID-19 patients, died at Chamarajanagar District Hospital due to oxygen shortage & others reasons in last 24 hours. We are waiting for the death audit report: District Incharge Minister Suresh Kumar
(Visuals from outside the hospital) pic.twitter.com/8wEOkEEBvm
— ANI (@ANI) May 3, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, चामराजनगरमधील सरकारी रुग्णालयाला शेजारील म्हैसूर जिल्ह्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. पण रविवारी हा पुरवठा नेहमीप्रमाणे होऊ शकला नाही. परिणामी, ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात असून राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच मंगळवारी आपत्कालीन कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री एस. सुरेश यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शेजारणीसोबत भांडण झाल्याने दोन मुलांसह महिलेची इमारतीवरून उडी, दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
- ‘भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन सत्तांतराचा चमत्कार होण्याची शक्यता’
- बारामतीत लॉकडाऊन तर आता ‘या’ मनपा क्षेत्रात सात दिवस जनता कर्फ्यू
- मध्यप्रदेश, ओडिशानंतर ममतांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, माध्यम क्षेत्रात उमटले पडसाद
- …तर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे १७० उमेदवार निवडून आले असते – रामदास आठवले


