पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. राज्यातील नागरिक या संकटाशी दोन हात करत असताना आता राज्यावर आणखी संकट घोंगावत आहे. एकीकडे कोरोना विषाणूशी झगडत असताना अस्मानी संकटाने राज्यावर दुहेरी आघात केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास हिरावून गेला आहे. आजही राज्यात पावसाची स्थिती कायम असून पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
काल राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी विजा पडल्यानं विविध ठिकाणी किमान 11 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर एकट्या मराठवाड्यात एकूण पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे पुण्याजवळील भोर याठिकाणी वीज पडून दोन चिमूरड्या मुलींचा जीव गेला आहे. त्यामुळे या अस्मानी संकटात काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
Thunderstorms with lightning, gusty winds & moderate to intense spells of rain very likely over Jalgaon, Dhule, Pune, Ahmednagar,Nasik,Nandurbar, Satara, Aurangabad, Jalna, Beed & Osmanabad. Possibility of hail at isolated places. pic.twitter.com/v45Fw8MNEb
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 3, 2021
आज जळगाव, धुळे, पुणे, अहमदनगर, नाशिक नंदुरबार, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तवला आहे. याठिकाणी तुफान वादळासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- जनतेसाठी काम करण्याची सद्बुद्धी पांडुरंग ‘महावसुली’ सरकारला देवो !
- कोरोनाचे सौम्य लक्षणे असल्यास CT-SCAN करू नका, एम्सच्या संचालकांनी सांगितलं गंभीर ‘कारण’
- पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झालेत, टीका सहन करण्याचीही ताकद असायला हवी – वडेट्टीवार
- शेजारणीसोबत भांडण झाल्याने दोन मुलांसह महिलेची इमारतीवरून उडी, दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
- ‘भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन सत्तांतराचा चमत्कार होण्याची शक्यता’


