Share

लखीमपूर हिंसाचार; चंदीगडमध्ये आंदोलन करणारे नवज्योत सिंह सिद्धू पोलिसांच्या ताब्यात

Published On: 

चंदीगड: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना पोलिसांनी चंदीगडमधून ताब्यात घेतले आहे.

पंजाब-चंदिगढमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. यात काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू सहभागी झाले आहेत. शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाड्या चालवणाऱ्यांना अटक करायला हवी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. दरम्यान, लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या घटनेनंतर त्या ठिकाणी भेट देणाऱ्या अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

https://twitter.com/ANI/status/1444948816495616000

लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनावेळी हिंसाचाराची घटना घडली. यात चार शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे तिकोना भवानीपूर दौऱ्यावर असताना ही घटना घडली. त्यानंतर बिगर भाजपाशासित राज्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर विरोधकांनी या प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे, पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांनी रविवारी एक ट्विट केले. त्यांनी आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला आहे. पंजाबचे पोलीस प्रमुख आणि महाधिवक्ता यांना बदलण्याची मागणी सिद्धूंनी केली आहे. असे केले नाही, तर आपण तोंड दाखवण्यालायक राहणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. चरणजीत सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर पोलीस महासंचालक आणि महाधिवक्ता बदलण्यासाठी सिद्धूंनी सिद्धू यांनी ट्विट करून पुन्हा दबाव आणल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!