मुंबई : नुकतीच रोड सेफ्टी वर्ल्ड टी ट्वेन्टी सिरीज पार पडली. या सिरीजमध्ये युवराज सिंह फॉर्ममध्ये दिसून आला. आपल्या बॅटिंगने पुन्हा प्रतिस्पर्ध्यांवर हुकमत जागवत चौकार षटकारांचा पाऊस पाडला. अगदी एका ओव्हरमध्ये चार षटकार लगावून इंग्लंडविरुद्ध लागोपाठ 6 षटकारांची आठवण संबंध जगाला करुन दिली.
आता पुन्हा एकदा युवराज सिंह चर्चेत आला आहे. परंतु या वेळी आपल्या खेळीसाठी नव्हे तर तो त्याच्या नव्या लुकमुळे चर्चेत आला आहे. युवराजला या लूकमुळे भरभरून कंमेंट येऊ लागल्या आहेत युवराजच्या नव्या लुकवर भारतीय क्रिकेटपटूंनीही काही कमेंट केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CM1mn_fDthx/?utm_source=ig_web_copy_link
युवराजने नव्या हेअर स्टाईल लुकचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या फोटोमध्ये त्याचे केस लांब दिसत आहेत. याआधी सगळ्यांनी युवराज अगदी छोट्या केसांमध्ये पाहिलं आहे. मात्र इतक्या वर्षांत पहिल्यांदाच सगळे जण युवराजला मोठ्या वाढलेल्या केसांमध्ये पाहत आहेत.
https://www.instagram.com/p/CMy3i9UjBPq/?utm_source=ig_web_copy_link
युवराजने नव्या हेअर स्टाईल लुकचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्यानंतर रविंद्र जाडेजाने कमेंट करत युवी पा काय होते आणि काय झाले…?, अशी मजेशीर कमेंट केली आहे. शिखर धवनने कमेंट करत बादशहा वाटत आहात, असं म्हटलंय. तर दुसरीकडे हरभजनने वेगळीच कमेंट करत ‘सिरी पाजी का स्टाईल’ अशी कमेंट केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दीपाली चव्हाण यांची आत्महत्या आहे की खून याचा तपास झालाच पाहिजे : भाजप
- कॅन्टीन चालवू देण्यासाठी एक लाखाची लाच; महिला सहाय्यक निरीक्षकावर गुन्हा दाखल
- भारताची Playing XI ; सूर्यकुमार यादव की ऋषभ पंत अय्यरची जागा कोण घेणार?
- …तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, महिला अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांची ठाम भूमिका
- बँका, रेल्वे नंतर आता राष्ट्रीय महामार्ग देखील खासगीकरणाच्या उंबरठ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

