Share

अभिनेता कुशल बद्रिकेने मांडली ठाणेकरांची व्यथा, महापालिकेकडे हि विनंती

Published On: 

मुंबई : नेहमी हसवणारा अभिनेता कुशल बद्रिकेने एका गंभीर विषयावर भाष्य केले आहे. ठाण्यातील एका गंभीर समस्येला फेसबुक लाईव्हद्वारे कुशल बद्रिकेने वाचा फोडली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून कुशलने ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करत काहीतरी करा अशा शब्दात ठाणेकरांचीव्यथा मांडली आहे. रात्री उशिरा कुशल बद्रिकेने हे लाईव्ह केले आहे.

या फेसबुक लाईव्हमध्ये कुशलने एक ट्रक बंद अवस्थेत असल्याचे दाखवला आहे. रोज या ठिकाणी होणाऱ्या अपघातांमुळं लोकांना यामुळं खूप त्रास होत असल्याचे कुशलने म्हटलले आहे. मी खूप दिवस विचार करत होतो. रोज इथं काही ना काही घडत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे हे पोहोचावे आणि काही उपाय केले जावेत यासाठी हा प्रयत्न असल्याचं कुशलनं म्हटलं आहे. मला या गोष्टीचं फार वाईट वाटते आहे , लोकांना मदत व्हावी, एवढीच अपेक्षा आहे, असं कुशलनं म्हटलं आहे.

लाईव्ह करत कुशल म्हणाला ‘तसेच हा माझा कोणताही स्टंट नाही, कोणाकडेही माझे बोट दाखवत नाही. मी खूप दिवसांपासून विचार करत होतो. नेहमी याठिकाणी काही ना काही घडत असतं. हा व्हिडीओ त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचावा, लाईट लावा किंवा रेडियम लावा जेणेकरुन वाहन चालकांना ज्याठिकाणी ब्रीज सुरु होतो ते कळेल, त्यामुळे अनेकांचे जीव वाचवू शकतो असंही कुशल बद्रिकेने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

आता दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तानसोबत टक्केवारी? आशिष शेलरांची शिवसेनेवर बोचरी टीका

अभिनेता कुशल बद्रिकेने मांडली ठाणेकरांची व्यथा, महापालिकेकडे हि विनंती

माजी अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!