मुंबई : माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे . यानंतर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम याच्यासह 6 जणांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कमलेश चंद्रकांत कदम, संजय शांताराम मांजरे, राकेश राजाराम बेळणेकर, प्रताप मोतीरामजी सुंद वेरा, सुनील विष्णू देसाई आणि राकेश कृष्णा मुळीक आहे. कांदिवलीतील निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. यामध्ये त्यांच्या डोळ्याला देखील दुखापत झाली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका केली होती. उद्धवजी हा गुंड राज बंद करा, अशा शब्दात फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला होता.
याप्रकरणी कांदिवली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनीच स्वत; तक्रार दिली आहे. त्यानंतर, भादंवि अनुसार 325, 143, 147, 149 अन्वये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर आता शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवर आक्षेपार्ह व्यंगचित्र पोस्ट करणाऱ्या महिलेला जमीन देण्यास नकार
महाराष्ट्रात सरकारचा आतंक आणि अत्याचार वाढतोय – कंगनाचा घणाघात
‘ हिला मुंबईने सगळं दिल,पण हीचं गद्दार निघाली ‘
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

