Share

आता दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तानसोबत टक्केवारी? आशिष शेलरांची शिवसेनेवर बोचरी टीका!

Published On: 

मुंबई : माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . यानंतर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम याच्यासह 6 जणांचा समावेश आहे.

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांचे फक्त व्यंगचित्र व्हाट्सअप वरुन फॉरवर्ड केलं म्हणून शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत.

भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी देखील या घटनेवरून शिवसेनेसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ” कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री..टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगणाचे घर तोडलेत..आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण! निषेध!! पुढे कायदाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी?” अशी जळजळीत टीका आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे.

तर ही घटना कांदिवली पूर्व येथील असून तेथील भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी, ” आता निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांवर सुद्धा हल्ला करण्याइतकी खालची पातळी शिवसेनेने गाठली आहे. अशा गुंडांना घाबरून राज्यातील व मुंबईतील जनता गप्प बसेल असे मुख्यमंत्र्यांना व शिवसेनेला वाटत असल्यास ते मोठ्या भ्रमात आहेत. सत्तेचा हा माज जनता येणाऱ्या काळात उतरवल्या शिवाय राहणार नाही,” असेही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!