मुंबई : गेल्या एक दिड वर्षापासुन कोरोना संसर्गामुळे संपुर्ण जनजिवन ठप्प झाले होते. या काळात बॉलीवूडसह जगभरातील चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. मात्र कालांतराने कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागाला आहे. यादरम्यान अनेक निर्मात्यांनी त्यांचे रखडलेले चित्रपट पुर्ण करण्याच्या मार्गावर लागले आहे.
याच पार्श्वभूमिवर बॉलीवूडचा सुपरस्टार ह्रतिक रोशनने त्याचा आगामी महत्वाकांक्षी ‘क्रिश ४’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. काल २३ जुन रोजी ‘क्रिश’ च्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमिवर त्याने ट्विट करत क्रिश ४ चे संकेत दिले आहे. या ट्विटमध्ये ह्रतिकने ‘भुतकाळ संपला आहे. बघुयात भविष्य काय घेऊन येईल’ असे कॅप्शन देत फिफ्टीन ईयर्स ऑफ क्रिश आणि क्रिश ४ हा हॅशटॅग वापरला आहे. या ट्विटमध्ये क्रिशचा मास्क हवेतुन खाली पडताना दिसत आहे.
The past is done .
Let’s see what the future brings. #15YearsOfKrrish #Krrish4 pic.twitter.com/xbp5QzwObF— Hrithik Roshan (@iHrithik) June 23, 2021
ह्रतिकच्या या ट्विटनंतर चाहंत्यामध्ये कमालीची उत्सुकता लागली आहे. २०१९ साली ‘वॉर’ हा ह्रतिकचा अखेरचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर मागील वर्षी त्याने दिपीका पादुकोन सोबत फायटर या चित्रपटाची घोषणा केली होती. क्रिश या मालिकेचा अखेरचा चित्रपट ‘क्रिश ३’ हा २०१३ मध्ये आला होता. क्रिश ४ च्या प्रदर्शनाची तारिख किंवा इतर गोष्टीचा उलगडा अद्यापही केलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
- घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, मुख्यमंत्र्यांचा सात जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
- मनातून काँग्रेस जात नाही, भाजपातील अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक – नाना पटोले
- जिओचा आता सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन ‘या’ तारखेला येणार बाजारात !
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दिक्षांत समारंभ शुक्रवारी
- औरंगाबादेत सकाळी ७ वाजेपासून लसीकरण केंद्रांवर लांबच लांब रांगा, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!


