Share

रेणू शर्मांवर आरोप करणाऱ्या कृष्णा हेगडेंनी भाजपला रामराम ठोकत हाती शिवबंधन बांधलं !

Published On: 

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्याशी संबंध असलेल्या करुणा शर्मा यांच्या बहिणीनेच अत्याचार केल्याचे गंभीर आरोप केले होते. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. नैतिकतेची जबाबदारी लक्षात घेता मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपने आंदोलन पुकारलं असतानाच भाजपच्या कृष्णा हेगडे यांनीच रेणू शर्मा यांच्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप केले होते.

यामुळे हे प्रकरण हनीट्रॅपचे आहे का ? असा सवाल निर्माण होत होता. यानंतर रेणू शर्मा यांनी आपला राजकीय फायदा होत असल्याच्या सांगत मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली होती. मात्र, कृष्णा हेगडे यांच्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं. आता त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. ते भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचं बोललं जात होतं. त्यांच्याकडे भाजप मुंबई उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती.

अखेर त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मूळचे काँग्रेस पक्षाचे असलेल्या हेगडेंनी मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातून निवडणूकही जिंकली होती. सद्या हा मतदारसंघ हा भाजपकडेच असून पराग अळवणी हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. तत्कालिन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम व हेगडे यांच्यात वाद निर्माण झाल्यामुळे त्यांनी भाजपची वाट धरली होती. मात्र, गेल्या काही काळापासून ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. अखेर आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवबंधन बांधलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!