औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एएससीडीसीएल) क्रांती चौकातील फुटपाथ विकासासह शहरातील रस्त्यांचा परिवर्तन प्रकल्प हाती घेतला आहे. शहराने स्मार्ट सिटीज मिशनच्या देशव्यापी स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजमध्ये सहभाग घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत क्रांती चौक ते उस्मानपुरा सर्कल, पैठण गेट ते गुलमंडी, एमजीएम-प्रियदर्शिनी गार्डन स्ट्रीट आणि कॅनॉट प्लेस या चार भागांची निवड करण्यात आली आहे.
क्रांती चौक ते रेल्वे स्थानकापर्यंत तयार केलेल्या, सायकल ट्रॅकला पूरक होण्यासाठी एएससीडीसीएलने क्रांती चौक ते औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत १५० मीटरवर पेव्हर ब्लॉक बसवले आहेत. एएससीडीसीएलच्या सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी आणि स्नेहा मोहन यांनी सांगितले की, ‘ क्रांती चौक शहराच्या मध्यभागी आहे. शहरातील नागरिक कुटुंबातील सदस्यांसमवेत, वयोवृद्ध तसेच तरुण मंडळी वेळ घालविण्यासाठी येथे येतात. नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून एएससीडीसीएलने रस्त्याच्या बाजूला नवा लूक दिला आहे ‘. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद दौऱ्यात या सायकल ट्रॅक आणि रस्त्यांचा होणारा विकास पाहून समाधान व्यक्त केले होते. पर्यावरण आणि निरोगी जीवनासाठी असे प्रकल्प पूरक असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार गोट्या खेळतय का ? वेळकाढूपणा खपवून घेणार नाही’
- संमेलनाध्यक्षापदासाठी मसापकडून भारत सासणे यांचे नाव
- कर्जबाजारीपणामुळे पती-पत्नीची गोदावरीत उडी
- सिरममधील आगीमागे नेमकं कारण काय ? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
- आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय; राज्य सरकारच्या कारभारावर गिरीश महाजन बरसले !

