औरंगाबाद : नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे नाव पाठविण्यात आले आहे. सासणे यांच्या या नावालाच परिषदेचा भक्कम पाठिंबा असेल, अशी चर्चा आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त साहित्य वर्तुळात काही अंतर्गत चर्चा सुरू आहेत. त्यानूसार, संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी भारत सासणे यांच्यासह आणखी एक नाव पाठविण्यात आले आहे. हे नाव मात्र कोणते हे समोर आलेले नाहीये. पण ते साहित्यिक मराठवाड्यातीलच असावेत.
यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होणार, याविषयीची उत्कंठा वाढत चालली आहे. संमेलनाध्यक्ष पदासाठी डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन वाघमारे यांची नावे विविध साहित्य संस्थांकडून पुढे आलीत. पण मराठवाडा साहित्य परिषदेतून मात्र संमेलनाध्यक्षाबाबत मौन पाळले जात होते. त्यामुळेच मराठवाडा साहित्य परिषदेकडून कोणाचे नाव यंदा पुढे होणार आहे, याबाबत उत्सुकता आहे. २४ जानेवारी रोजी नाशिक येथे होणाऱ्या बैठकीत संमेलनाध्यक्ष कोण होणार, याला पूर्णविराम मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी लावलेले अनधिकृत फलक काढले म्हणून पोलिसांचा दुखावला इगो !
- राज्य सरकारने राणेंची सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने 12 कमांडोजची सुरक्षा पुरवली
- अर्नब गोस्वामी विरोधात कठोर कारवाई करा, उद्या कॉंग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन
- …तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही; वीजबिलावरून दरेकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा
- सिरम इंस्टिट्युटमध्ये आग; अदर पुनावाला यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

