मुंबई : ‘राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला कोणत्याही मंत्र्यांनी गैरहजेरी लावू नये. कुठलीही अडचण असेल, तरी बैठकीला उपस्थित राहायचंच आहे’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गैरहजर मंत्र्यांना खडसावलं होते. काल मुंबईत मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीला काही मंत्र्यांनी दांडी मारल्यामुळे अजित पवार यांचा पारा चढल्याचे पहायला मिळाले. मंत्रिमंडळ बैठकीला अजिबात गैरहजर राहू नका, अशी तंबी पवारांनी गैरहजर मंत्र्यांना दिली होती.
अजित पवार यांच्या नाराजाचीचा संदर्भ पकडत राज्यातील मंत्री कॅबिनेट विषयी गंभीर नाहीत असा आरोप भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ‘राज्य सरकारची परिस्थिती आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातंय, अशी आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. अजित पवारांना कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहाण्यासाठी मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे,’ असा आरोप गिरीश महाजन यांनी महाविकासआघाडीवर केला आहे
दिल्लीत जागा मिळत नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे विविध मागण्यांसाठी त्यांच्या मूळ गावी राळेगणसिद्धी मध्ये आंदोलन करणार आहेत यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, ‘मी किंवा देवेंद्र फडणवीस हे देखील अण्णा हजारेंची भेट घेऊ, अण्णा हजारेंच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्या मागण्या असतील त्यासंदर्भात केंद्रातील अधिकारी आणि केंद्रीय मंत्री यांची अण्णा हजारेंसोबत चर्चा घडवून आणणार आहे. अण्णा हजारेंनी वयाचा विचार करता उपोषणाचा निर्णय घेऊ नये’.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी लावलेले अनधिकृत फलक काढले म्हणून पोलिसांचा दुखावला इगो !
- राज्य सरकारने राणेंची सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने 12 कमांडोजची सुरक्षा पुरवली
- अर्नब गोस्वामी विरोधात कठोर कारवाई करा, उद्या कॉंग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन
- …तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही; वीजबिलावरून दरेकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा
- सिरम इंस्टिट्युटमध्ये आग; अदर पुनावाला यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

