Share

क्रांतीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीची वेळ; अद्याप प्रतिक्रिया नाही

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक रोज नवनवीन आरोप करत आहेत. यामुळे मलिक यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान या प्रकरणावरून काल राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात उडी घेत थेट क्रांती रेडकर यांनाच इशारा दिला आहे. यानंतर आता क्रांतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित त्यांच्या भेटीची वेळी मागितली आहे. मात्र यावरून अद्याप मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
या सर्व घडामोडीनंतर क्रांती रेडकर यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. ‘लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?’, असा सवाल क्रांती यांनी विचारला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!