Share

येथे आठ दिवसांत कार्यान्वीत होणार कोविड-१९ स्वॅब तपासणी प्रयोगशाळा, आरोग्यमंत्र्यांचे आदेश 

Published On: 

भंडारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भंडारा येथे कोविड-१९ स्वॅब तपासणी प्रयोगशाळा (आरटीपीसीआर लॅब) सुरू करण्यास मंजुरी देण्यात येत असून, आठ दिवसांच्या आत प्रयोगशाळा कार्यान्वीत करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिले. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सपोर्ट बेड या सुविधा अद्ययावत करण्यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व तपासण्या वाढविण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. स्वॅब तपासणी प्रयोगशाळा भंडारा येथे होणार असल्यामुळे तपासणी अहवाल तात्काळ उपलब्ध होणार आहे. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील सुविधांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोविड-१९ चे लक्षणं असलेल्या संशयीत रूग्णांचा स्वॅब घेतल्यानंतर तो तपासण्याची सुविधा भंडारा येथे नव्हती. स्वॅब नागपूर येथे तपासणीसाठी पाठवावे लागत आहेत. अहवाल येण्यास २ ते ३ दिवस उशीर होत असल्याने उपचारासाठी वेळ लागत आहे. ही अडचण पाहता भंडारा येथे तातडीने आरटीपीसीआर तपासणी प्रयोगशाळा मंजूर करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ही प्रयोगशाळा एका आठवड्यात कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यासाठी लागणारे मनुष्यबळ जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकारात तात्काळ उपलब्ध करून घ्यावे. तसेच प्रशिक्षणासाठी नागपूर येथे पाठविण्यात यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्या. मास्क न वापरणार्‍यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिस विभागाला दिले. जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्यमंत्री यांच्या हस्ते ट्रुनॅट प्रणालीचे उद््घाटन करण्यात आले. सदर मशिनव्दारे दिवसाला ६0 टेस्ट होऊ शकतात. यामुळे दोन तासामध्ये निश्‍चित व अचूक निदान करणे शक्य होणार आहे.

याव्दारे कोरोना रूग्ण तपासणीस वेग प्राप्त होणार आहे. ट्रुनॅट मशिनद्वारे कोविड-१९ चे अचूक निदान होऊन तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. कोविड-१९ उपचारासाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी निदर्शनास आणून दिले. कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणारे डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉय यांची तात्पुरती भरती करण्याचे सर्व अधिकार आरोग्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे लिक्वीड ऑक्सिजन टँक  उभारण्याच्या प्रस्तावास आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत मंजूरी दिली. त्याच प्रमाणे २0 ड्युरा सिलेंडरच्या प्रस्तावासही यावेळी मंजूरी देण्यात आली.

उपजिल्हा रूग्णालय तुमसर, साकोली व ग्रामीण रुग्णालय पवनी येथे कोविड रुग्णालय स्थापन करण्याकरीता आवश्यक मनुष्यबळ मंजूर करण्याची विनंती आरोग्य विभागाने या बैठकीत केली असता त्यांनी सहमती दिली. सामान्य रुग्णाला त्रास होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घ्यावी असे सांगूण आरोग्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्ट बेड तयार करण्यात यावेत. कोरोनाच्या उपचारासाठी आयएमएच्या सदस्यांना सहभागी करून घ्यावे. आयएमए सदस्यांना विश्‍वासात घेवून उपचाराचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा असे ते म्हणाले. कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम अतिशय उपयुक्त असून या मोहिमेद्वारे मोठय़ा प्रमाणात जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रूग्णालयात टोपे यांनी नर्स व डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या लढाईत आपले योगदान महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी डॉक्टरांचे मनोबल वाढविले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!