मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाने कामासाठी जागा नसल्याचे कारण देत सुनावणी स्थगित केली होती. त्यानंतर राज्य सरकारने त्यांना योग्य जागा देऊ असे आश्वास दिल्यानंतर पॅनलने आता सुनावणीचे वेळापत्रक जारी केले. त्यानुसार १५ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा चौकशी सुरू केली जाणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव आणि इतर अधिकार्यांना लिहलेल्या पत्रात आयोगाचे सचिव व्ही व्ही पालनीटकर म्हणाले होते की,’२८ ऑक्टो.ला झालेल्या बैठकीत, आयोगाचे अध्यक्ष, न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी प्रधान सचिव, गृह, यांना हा मुद्दा थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे न्यावा आणि तातडीने योग्य जागेची व्यवस्था करावी.’
दरम्यान, कोरेगाव भीमा येते १ जाने. २०१८ रोजी झालेल्या हिंसाचारात अनेकजण जखमी झाले होते. या हिंसाचाराच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. २०१८ मध्ये आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी सुरुवातीला चार महिन्यांची मुदत देण्यात आली होती, परंतु त्याचा कार्यकाळ वारंवार वाढवावा लागला. मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या माहिती विभागात तात्पुरती जागा दिलेल्या या आयोगाला काम करणे कठीण जात होते. त्यानंतर मुंबईतील सर्व सुनावण्या स्थगित केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
- ‘…हा तर फुसका बॉम्ब’, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवरून शिवसेनेचा हल्लाबोल
- ‘जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले’, राऊतांचे टीकास्त्र
- भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयाच्या चिल्ड्रन्स वॉर्डला भीषण आग; चार बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

