Share

परभणी पालिकेच्या वसुलीच्या कामात कोराेनामुळे अडथळा !

Published On: 

परभणी : परभणी महानगर पालिकेच्या कर वसुलीला कोरोना संसर्गाच्या वाढत्या संख्यामुळे आता मात्र अडथळा यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मनपाची कर वसुलीची मोहिम मात्र ठप्प पडलेली दिसुन येत आहे.

नागरिकांकडून परभणी महानगर पालिका ही मालमत्ता, पाणी पट्टीची वसुली करते. तर या वसुलीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर मनपाच्या सर्व कारभार चालत असतो. तर मागच्या वर्षीपासुन कोरोना तसेच लॉकडाऊन या सर्व परिस्थितीमुळे खुप मोठा फटका मनपाला बसलेला दिसून येतो. त्याच मुळे मागच्या वर्षीपासुन मनपाची  वसुली मोहिम ही ठप्प पडली आहे. तर यंदा २०२१ मधील मार्च मध्ये देखील पुन्हा कोरोनाचा कहर वाढण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम लॉकडाऊन, जिल्हा बंदी आदींमुळे नागरिकांच्या उत्पन्नावर खुप मोठा परिणाम झाला. याचा परिणाम थेट मनपाच्या कर वसुलीवर झालेला दिसुन येतो.

याच बरोबर दिवसांची संचारबंदी तर कधी रात्रीची संचारबंदी, लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवांना परवानगी इतर व्यवहार बंदी याचा फटका तर सरळ येथील बाजारपेठांवर देखील पडला आहेत. यातच नागरिकांचा उत्पन्नाचा स्त्रोत राहिला नसल्याने मनपाच्या वसुली मोहिमेला प्रतिसाद देखील मिळाला नाही. दरम्यान नागरिकांकडून वसुलीपोटी २३ कोटी रुपयांची सुरु असलेली मालमत्ता करापोटी रक्कम येणे बाकी आहे, या वेळी १० ते १२ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. आता येवठ्या कमी रुपयांमध्ये प्रशासन कसे गतीमान होणार आणि येण्याऱ्या पावसाळ्यामधील करण्यात येणारी स्वच्छता कशी करणार, शहरात मनपा कसे काय काम करु शकेल यात मात्र शंकाच आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!