मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह महाराष्ट्रात विविध उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांची दमछाक होत आहे. अख्ख्या जगातील संशोधक, तज्ज्ञ मंडळी कोरोनावर संशोधन करत आहेत. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील कोकण भागातील परिस्थिती देखील अशाच प्रकारे भयानक आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील परिस्थिती आज चिंताजनक आहे. सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 15,166 रुग्ण बाधित झाले. त्यातील 11,000 रुग्ण बरे झाले आहेत. आज सिंधुदुर्गमध्ये 3675 अॅक्टिव्ह रुग्ण असून केवळ 1015 इतक्याच बेड्सची व्यवस्था आहे. तसेच रत्नागिरीत सध्या 27 हजार 677 रुग्ण असून 19, 447 रुग्ण बरे झाले आहेत. तर 7772 रुग्ण उपचार घेत असून त्यांना बेड्सची कमतरता भासत आहे.
आज आपण मुंबई, पुण्यातील रुग्णसंख्येबाबत बोलत आहोत. मात्र कोकणातील परिस्थितीचे काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का? असा सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे. ‘कोकणाने आजवर शिवसेनेला काय नाही दिले? पण या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोकणाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे.’ अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी अशी विनंती करतो. pic.twitter.com/6QbZuK7VJd
— Prasad Lad (@PrasadLadInd) May 8, 2021
तसेच सिंदुधुर्ग आणि रत्नगिरीतील ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी. सर्व आमदार, खासदारांसह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे का असेन पण एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. मात्र तरीही जिल्ह्यांत ही भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. गावागावातील सेवाभावी संस्था कोकणवासीयांची सेवा करत आहेत. मात्र यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक, आमदार कुठेही दिसत नाहीत, असा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही’ ; भाजपाच्या आमदाराचा अनोखा दावा
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
- यांच काही वेगळच चाललंय, निवृत्ती स्विकारण्याच्या वयात कसोटी पदार्पण; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम
- ‘कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याऐवजी २० हजार कोटींचा ‘सेंट्रल व्हिस्टा’ हवा कशाला ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

