🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे मोठ संकट उभ राहील आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ही मोठा ताण आला आहे. वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे अनेकांचा जीव गेला आहे. अशातच भाजपाच्या एका आमदाराने ‘रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही’ असा दावा करत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
BJP Baliya MLA surendra singh is advising people to have Gaumutra (Cow Urine ) for Corona treatment #Corona #मोदी_इस्तीफा_दो #Coronil pic.twitter.com/LPC8p35QDh
— Aditya Bidwai (@AdityaBidwai) May 7, 2021
या व्हिडियोमध्ये भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही असं म्हणत गोमूत्र प्राशन केल्याचे यामध्ये दिसत आहे. या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सिंह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यापूर्वी, आसाममधील भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांनी देखील गोमुत्र आणि शेणामुळे कोरोनासारखा आजारही बरा केला जाऊ शकतो, असा दावा केला होता.
कोरोनावर उपाय शोधण्यासाठी अनेक स्तरावरून प्रयत्न केले जात आहे. सध्या यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये वेगाने लसीकरण देखील सुरू करण्यात आले आहे. देशात अनेक प्रश्न निर्माण झाले असताना कोरोनाच्या या संकटामध्ये अशा प्रकारचे धक्कादायक दावे करण्यात येत असल्याने अनेकांकडून याबाबत रोष व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
- यांच काही वेगळच चाललंय, निवृत्ती स्विकारण्याच्या वयात कसोटी पदार्पण; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम
- ‘कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याऐवजी २० हजार कोटींचा ‘सेंट्रल व्हिस्टा’ हवा कशाला ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
