सिंधुदुर्ग : कोकणवासियांसाठी आज खरोखर मोठा दिवस आहे. कारण सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर आले आहेत. चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय विमान वाहतूक उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित आहेत. ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.
या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, सुभाष देसाई, विनाययक राऊत, रामदास आठवले, अनिल परब असे सर्व पक्षीय नेते उपस्थित आहेत. या कार्यक्रमामध्ये आता राणे- ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राणेसाहेब, हप्तेखोरांची नावं जाहीर कराच; वैभव नाईक यांचं ओपन चॅलेन्ज
- राणेसाहेब मंचावर मन मोकळं करणार आहेत, ते कुणाला आवडेल तर कोणाला खुपेल- नितेश राणे
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद; एनसीबीची पोलखोल करणार!
- लसीकरणाला गती देण्यासाठी सुरु करण्यात आलेले ‘मिशन कवच कुंडल’ अभियान नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

