मुंबई : ‘कोई मिल गया’ या चित्रपटातील अभिनेता रजत बेदी विरोधात मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. स्त्यावरून चालणाऱ्या एका व्यक्तीला रजतच्या कारने धडक दिली असून जखमी व्यक्तीवर कूपर रुग्णालयात उपचार कण्यात येत आहे. कारच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.
७ तारखेला सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान हि घटना घडली होती. मात्र जखमी व्यक्ती सकाळी दारूच्या नशेत रस्ता ओलांडत असल्याने त्याला रजतच्या गाडीची धडक बसली. तर रजतने जखमी व्यक्तीच्या नातेवाईकांना त्या व्यक्तीचा पूर्ण उपचार करण्याचं आश्वासन दिलं होते.
याप्रकरणी रजतच्या विरोधात आयपीसी आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची चौकशीही सुरु आहे. अजून पोलिसांनी रजतला अटक केलेली नाही. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जखमी व्यक्तीच्या डोक्याला मार लागला होता. तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान आता या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने रजतच्या अडचणीत आता अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
