Share

करीनावर चाहते नाराज जाणून घ्या कारण…

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान. ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. त्यात जेव्हा करीनाने तैमूरला जन्म दिला होता. तेव्हा त्यांच्या चाहत्यांसाठी ही सगळ्यात उत्साहाची बातमी होती.

एवढंच नाही तर त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माने हा उत्साह काही कमी झालेला नाही. बॉलीवूड अभिनेता सैफअली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर हा नेहमीच चर्चेत असतो. तैमुरच्या छोट्या भावाचे नाव काय ठेवणार याकडे साऱ्या बॉलीवूड चाहत्यांचे लक्ष आहे. करीनाच्या दुसऱ्या मुलाचा जन्म होऊन आता बराच काळ गेला आहे. तरी सुद्धा करीना आणि सैफने त्यांच्या बाळाचे नाव कोणाला सांगितले नाही किंवा त्या बाळाचा फोटो शेअर केलेला नाही. या सगळ्यामुळे करीनाचे चाहते निराश झाले आहेत.

बाळाला जन्म दिल्यानंतर करीनाने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये बाळ दिसत नसल्याने चाहते निराश झाले आहेत. कारण तिच्या चाहत्यांना तिच्या दुसऱ्या मुलाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. करीना लवकरच लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे सैफने नुकतंच आपल्या ‘भूत पुलिस’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तो लवकरच ‘आदिपुरूष’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!