Share

देशाचा स्वातंत्र्यलढा, लोकशाहीची स्थापना व राष्ट्र उभारणीत काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान-अशोक चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. आज काँग्रेस पक्षाला स्थापन होऊन तब्बल १३७ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज देशभर काँग्रेस स्थापना दिवस साजरा केला जात आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवरच काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

‘देशाचा स्वातंत्र्यलढा, लोकशाहीची स्थापना व राष्ट्र उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. मागील तेरा दशके काँग्रेस लोकचळवळीची, लोकसेवेची प्रतिक राहिली असून, या गौरवशाली परंपरेचा पाईक असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
काँग्रेस स्थापना दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.’ असे ट्वीट अशोक चव्हाण यांनी केले आहे.

दरम्यान २८ डिसेंबर १९८५ साली मुंबई येथे गोपालदास संस्कृत कॉलेज मैदान येथे काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. ज्याचे प्रथम अध्यक्ष व्योमेशचंद्र बनर्जी होते. आज नवी दिल्ली येथे स्थापना दिवस निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!