Share

“केएल राहुल सध्या जागतिक क्रिकेटमधील अष्टपैलू फलंदाज”

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : माजी सलामीवीर आकाश चोप्राने (Aakash Chopra) केएल राहुलचे भर-भरून कौतुक केले आहे. त्याने केएल राहुलचे वर्णन सध्याच्या जागतिक क्रिकेटमधील अष्टपैलू फलंदाज म्हणून केले आहे, जो कोणत्याही फॉरमॅटमध्ये जबरदस्त फलंदाजी करू शकतो. सेंच्युरियन कसोटी सामन्यात केएल राहुलच्या शतकावर आकाश चोप्राने ही प्रतिक्रिया दिली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुलने जबरदस्त शतक झळकावले. तो अजूनही 248 चेंडूत 122 धावा करून नाबाद आहे. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 117 धावांची शानदार भागीदारी केली. मयंक अग्रवालनेही ६० धावांची सुरेख खेळी केली.

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडीओत केएल राहुलच्या जबरदस्त फलंदाजीवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, अष्टपैलुत्व म्हणजे तुम्ही खेळाडू म्हणून कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळू शकता. कसोटी असो, वनडे असो की टी-२०. त्याच्याकडे वेगवेगळ्या शैलीत फलंदाजी करण्याची क्षमता असली पाहिजे. त्याशिवाय, तुम्ही त्याला बॅटिंग ऑर्डरमध्ये कुठेही ठेवू शकता. जेव्हा अशा वैविध्यपूर्ण फलंदाजाचा विचार केला जातो तेव्हा माझ्या मनात एकच नाव येते आणि ते म्हणजे केएल राहुल. माझ्या मते, केएल राहुल सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील अष्टपैलू फलंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!