Share

‘रवी शास्त्री आहेत तोपर्यंत केएल राहुल आणि रोहित शर्मा यांची कारकीर्द सेट होणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टसाठी शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा झाली. यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना पुन्हा ट्रोल करण्यात आलं. दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीममध्ये चार बदल करण्यात आले. शुभमन गिल, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली. पण शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या केएल राहुल याला टीममध्ये संधी मिळाली नाही, त्यामुळे केएल राहुलचे चाहते नाराज झाले आणि त्यांनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रोल करायला सुरूवात केली.

पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामिगिरी केली. यामुळे टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले होते. या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मोहम्मद सिराजला दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागेवर संधी देण्यात आली आहे. तर शुभमन गिलला पृथ्वी शॉच्या जागी संधी मिळाली आहे. तर दुसऱ्या सामन्यातही केएल राहुलला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे केएल राहुलचे चाहते नाराज झाले आणि त्यांनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रोल करायला सुरूवात केली.

‘जोपर्यंत रवी शास्त्री भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक आहेत, तोपर्यंत केएल राहुल आणि रोहित शर्मा यांची कारकीर्द सेट होणार नाही, असे आरोप ट्रोलर्सनी केले. तसंच अनेकांनी केएल राहुलऐवजी हनुमा विहारीला संधी देण्याबाबतही आक्षेप घेतले.’

अशी आहे टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा ( उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!