पुणे:- मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यामुळे आरक्षणापासून वंचित राहणाऱ्या एसईबीसी उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश आणि सेवाभरतीसाठी होऊ शकेल. त्याकरता त्यांना आर्थिक मागास घटकासाठीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने दिलेल्या EWS आरक्षणाचं समर्थन केलं आहे. तसेच ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर परिणाम होणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी EWS आरक्षण हे ऐच्छित असून कुणावरही त्याची जबरदस्ती नाही. इच्छा असेल त्याने या आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
EWS चे आरक्षण हे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आहे. हे आरक्षण ऐच्छिक आहे. इच्छा असेल तर आरक्षण घ्या, या आरक्षणाची जबरदस्ती नाही. या आरक्षणाचा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. त्याचा सुनावणीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्या-चंद्रकांत पाटील
- रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून देशभर साजरा
- ‘मेरी ख्रिसमस फक्त अशा लोकांना जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत’
- हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली : शेलार
- शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित : मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

