मुंबई : मोदी सरकारने धर्मांतरण करणार्या अनेक संघटनांच्या मुसक्या आवळल्या आहेत पण राज्यात तीन बाटग्यांची सत्ता आहे. सत्तेसाठी लाचार शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे. त्यामुळे धर्मांतरण रोखणे हे काम आम्हाला करणे गरजेचे आहे असं भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आदिवासी भागात जाऊन तुषार भोसले यांनी अटल-गीता जयंती साजरी केली. यानिमित्ताने भजन, सामूहिक गीता पठण करुन थेट आदिवासी पाड्यांवर जाऊन १०० आदिवासी कुटुंबांना ‘गीता’ भेट देण्यात आली.
धर्मांतरण सुरु असलेल्या आदिवासी भागात जाऊन आज "अटल-गीता जयंती" साजरी केली. यावेळी भजन, सामूहिक गीता पठण करुन थेट आदिवासी पाड्यांवर जाऊन १०० आदिवासी कुटुंबांना गीता भेट दिली. "हिंदु धर्मात जन्माला आलो आणि हिंदु म्हणुनच मरणार" असा संकल्प देण्यात आला !. pic.twitter.com/FfP7oreRAo
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) December 25, 2020
दरम्यान, यावेळी आपण हिंदु धर्मात जन्माला आलो आणि हिंदु म्हणुनच मरणार असा संकल्प उपस्थितांना देण्यात आला. भाजपाचे व आध्यात्मिक समन्वय आघाडी चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्या-चंद्रकांत पाटील
- मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी
- इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, कुणावरही जबरदस्ती नाही- विजय वडेट्टीवार
- हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली : शेलार
- अखेर मनसे पुढे अॅमेझॉन झुकलं; मराठीचा भाषेचा लवकरच देणार पर्याय!


