मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.
स्पर्धा अर्धवट संपल्यानंतर मायदेशी परतत असताना इंग्लंडचा खेळाडू जोस बटलरने यशस्वी जैस्वालला एक बॅट भेट म्हणून दिली होती. यानंतर बटलरने राजस्थानचा युवा खेळाडु यष्टीरक्षक फलंदाज अनुज रावतला बटलरने वापरलेल्या त्याच्या यष्टीरक्षणाच्या ग्लोव्हज् वर स्वक्षरी करुन ते भेट म्हणून दिले. तसेच अनुजच्या राजस्थान रॉयल्सच्या टोपीवरही बटलरने स्वाक्षरी केली आहे. स्वाक्षरीसोबत ‘तुला माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा’ असे लिहीले आहे.
https://www.instagram.com/p/COhUCW-l_Qn/
या भेटीनंतर अनुजला खुप आनंद झाला. अनुजने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयावर शेअर केला आहे. अनुजने या व्हिडीयोला कॅप्शन देत, ‘सर्वोत्तम फलंदाज आणि तितकाच चांगला माणुस, तुझ्यासोबत ड्रेसींग रुम शेअर करणे माझ्यासाठी खुपच गौरवाची बाब होती.’ राजस्थान रॉयल्सने हा फोटो शेअर करत ‘एक खास भेट एका खास सलामीवीर खेळाडूकडून’ असे कॅप्शन दिले आहे. जोस बटलरने या स्पर्धेत ७ सामन्यात २५४ धावा केल्या होत्या यात एका शतकाचाही समावेश होता.
महत्वाच्या बातम्या
- अनुपम खेर यांना ‘हॅपी बर्थ डे’ साठी ‘बेस्ट अॅक्टर’ पुरस्काराने केले सन्मानित
- गँगस्टर अरूण गवळी झाले आजोबा; अक्षय-योगितला कन्यारत्न प्राप्त
- विराट- अनुष्का संस्थेमार्फत करणार कोरोनाग्रस्तांसाठी मदत
- सोलापूर शहराला वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी निधी देणार; भरणेंचे आश्वासन
- कोरोना विरुद्धच्या लढ्यात मुंबई इंडियन्सचा ‘हटके’ संदेश; सॅनिटायझर बॉटलचा फोटो केला ट्विट


