🕒 1 min read
दापोली: दापोलीमधील अनधिकृत रिसॉर्ट हा परिवहन मंत्री अनिल परब यांचा असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने करत आहेत. तो रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून किरीट सोमय्या हे काल प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला गेले होते. सोमय्या तिथे पोहचल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान तेव्हा त्यांची गाडी पोलिसांकडून अडवण्यात आली होती.
कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून काही काळासाठी सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला. तसेच या पोलीस स्टेशन वर
शिवसेना पोलीस स्टेशन असा बोर्ड लावा, असेही ते पोलिसांना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केला जाणार नाही- आदित्य ठाकरे
“अजून खूप माहिती बाहेर येणे बाकी”, यशवंत जाधवांवरील कारवाईवर सोमय्यांचा इशारा
२५ वर्ष मुंबईला लुटणाऱ्या ठाकरे कुटुंबाला जेल झालीच पाहिजे; ‘त्या’ कारवाईवरून निलेश राणे आक्रमक
“किरीट सोमय्या त्यांचं आंदोलन करण्यास समर्थ”- चंद्रकांत पाटील
तुम्ही तूर्तास यशवंत जाधवांवर बोला; ‘त्या’ वक्तव्यावरून भातखळकरांचा राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
