कराड – गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र भाजपनेते किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे. अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका किरीट सोमय्या यांनी मांडायला सुरुवात केल्यापासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. आजही त्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेवून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की, घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक केली जात आहे. मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची आहे, तक्रारदाराला राखण्याचे काम, जिल्हाबंदी करण्याचे काम ठाकरे सरकारने केलं आहे.
हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला अंबे मातेचं दर्शन घेता आलं नसल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तक्रार करणाऱ्यालाच अटक केली असल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी परिषदेत केला आहे. तक्रारदाराला रोखण्याचा इतिहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करू शकतात, असंही ते म्हणालेत. मला सहा तास कोंडून ठेवलं. वकिलांनी नोटीस दिल्यानंतर मग मला विसर्जन करायला जाऊ दिलं.
मला सीएसटी स्टेशनला अडवून ठेवलं.मला गाडी मिळणार नाही अशी व्यवस्था केली. पोलिसांनी खोटी बनवलेली ऑर्डर वाचून दाखवली आणि चॅलेंज केली तर पळून गेले, असं त्यांनी सांगितलं. गैरकायदेशीर डांबून ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी किरीट सोमय्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा सहन करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘सोमय्यांना रोखून भ्रष्टाचारावर पांघरूण पडेल’, या भ्रमातून ठाकरे सरकारने वेळीच बाहेर यावे’
- ‘कोल्हापूरला पोहचण्याआधीच पोलिसांचा मज्जाव, सोमय्यांना कराड येथे रोखलं’
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण


